Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
छत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर विभाग

मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार समाजाचा जात पडताळणी समितीविरोधात एल्गार !

छत्रपती नगर येथे मोर्चा आणि टाळेठोक आंदोलन; अन्यायाविरोधात समाजबांधव आक्रमक

छत्रपती नगर | 10 ऑगस्ट 2026  , चाणक्य न्यूज, प्रतिनिधी

मराठवाड्यातील कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजबांधवांनी जात पडताळणी प्रक्रियेत होत असलेल्या  अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. 10 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती नगर येथे अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढत टाळेठोक आंदोलन करण्यात आले.

https://youtube.com/shorts/o-qhX7LmNd4?feature=share

जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रकरणे तसेच निर्णय घेण्यास होणारा विलंब यामुळे समाजातील विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार आणि इतर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

               

मोर्चादरम्यान समाजबांधवांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. जात पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करावी, पात्र अर्जदारांच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा तसेच प्रलंबित जात वैधता प्रकरणांवर नियमानुसार जलद निर्णय घ्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान, मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!