स्वातंत्र्य दिनानिमित्त इंद्रिया ज्वेलरीकडून माजी सैनिकांचा सन्मान !

चाणक्य NEWS | प्रतिनिधी | पुणे
१५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंद्रिया ज्वेलरी (आदित्य बिर्ला), बंडगार्डन शाखेच्या वतीने देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिक, सेना, नौदल व वायुसेनेतील सैनिक आणि अधिकारी तसेच वीर पत्नी व वीर माता यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

देशाच्या संरक्षणासाठी आणि मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ समर्पित करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला सैनिक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच सैनिक फेडरेशनचे सचिव मा. श्री. दीपक राजे शिर्के, उपाध्यक्ष मा. श्रीमंत राठोड सर तसेच इतर सत्कारमूर्ती आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी इंद्रिया ज्वेलरीच्या वतीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबद्दल आभार मानले. सैनिकांच्या त्यागाची आणि देशसेवेची आठवण केवळ स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक क्षणी सैनिकांप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना जपली जावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
देशाच्या सुरक्षिततेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांचा सन्मान हा समाजाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असून, अशा उपक्रमांमधून सैनिकांच्या त्यागाची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होते.


