Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणे

दापोडीत रस्त्यावर कचऱ्याचा ढीग; नागरिकांच्या आरोग्याचा व वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील राहुल नगर, दापोडी (188/47 परिसर) येथे मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 15 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8:11 वाजता घेतलेल्या छायाचित्रांमध्ये रस्त्याच्या कडेला प्लास्टिक, घरगुती कचरा,  व इतर घनकचऱ्याचा मोठा ढीग पडलेला दिसून येत आहे.

या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास, माशा आणि भटक्या प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय हा कचरा मुख्य रस्त्यालगत असल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

चाणक्य NEWS या प्रकरणाकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधत असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!