पुण्यात रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक !
सोशल मीडिया व्हिडीओतील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी पोलिसांची कारवाई !
पुणे | चाणक्य NEWS | प्रतिनिधी
https://youtube.com/shorts/ZJFLk4NxDlg?feature=share
मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील नागरी प्रश्न आणि विकासकामांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करणारे रीलस्टार व युट्यूबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी अटक केल्याचे वृत्त आहे.
संतोष पंडित यांच्या सोशल मीडिया व्हिडीओमधील कथित आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत संतोष पंडित यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही आरोप
या प्रकरणात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरूनही तक्रार दाखल झाल्याचे वृत्त आहे.
भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.




