Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेपुणे विभागमहाराष्ट्र

हाउसिंग सोसायट्यांमध्ये महाप्रसादासाठी FDA नियम कडक; ७ दिवस आधी पूर्वसूचना आवश्यक

पुणे | चाणक्य NEWS | प्रतिनिधी

गणेशोत्सव, भंडारा, लंगर, इफ्तार किंवा सामूहिक अन्नवाटपाचे आयोजन करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नियम कडक केले आहेत. ३ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलेल्या ‘सण-उत्सव अंमलबजावणी दिनदर्शिकेनुसार’ सामूहिक अन्नवाटपासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोसायटीमध्ये केवळ रहिवाशांसाठी १००-२०० लोकांचा महाप्रसाद आयोजित केला तरी तो सामूहिक अन्नवाटपाच्या कक्षेत येऊ शकतो. कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस आधी संबंधित FDA अधिकाऱ्यांना सूचना देणे आवश्यक आहे.

             

प्रसाद तयार करणाऱ्या केटरर/आचाऱ्याकडे आवश्यक FSSAI परवाना/नोंदणी असणे, कच्च्या मालाची बिले जपून ठेवणे तसेच स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रसाद तयार करणाऱ्यांनी स्वच्छता साधने वापरणे, सुरक्षित पाणी वापरणे आणि अन्न Food Grade भांड्यांमध्ये साठवणे यावरही भर देण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्यामुळे सोसायटी व्यवस्थापनाने उत्सवापूर्वी संबंधित FDA कार्यालयाकडून लागू नियमांची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!