Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेमहाराष्ट्र

चाकणमध्ये चंदुकाका सराफतर्फे शिक्षकांचा सन्मान !

स्व. गुलाबराव गोरे शिक्षण संस्था व ज्ञानवर्धिनी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

चाकण NEWS | प्रतिनिधी

शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चाकण येथे चंदुकाका सराफ यांच्या नव्याने सुरू होणाऱ्या शाखेच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्था व ज्ञानवर्धिनी विद्यालय, आंबेठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे, ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, भामा स्कूलच्या प्रिन्सिपल माधुरी गोरे, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सचिन आभाळे सर, खैरे सर, चंदनशिवे सर तसेच चंदुकाका सराफ चाकण शाखेचे खंडु कुंभार आणि मार्केटिंग टीम उपस्थित होती.

     

यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भावनिक मनोगतामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकास गोरे आणि चंदुकाका सराफ चाकण शाखेचे खंडु कुंभार यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा तुळशीचे रोप व शाल देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक व लेखक अमरजीत सर यांनी प्रभावी व सुंदर पद्धतीने केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण झाला.

शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!