तक्षशिला प्रतिष्ठानचा भव्य दहीहंडी उत्सव जल्लोषात; अभिनेत्री श्रीलीला, रितू शिवपुरी व अनुष्का बेनके यांची प्रमुख उपस्थिती

पुणे | चाणक्य NEWS प्रतिनिधी :
तक्षशिला प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही फिनिक्स मॉलच्या पाठीमागील परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मा. नगरसेवक राहुल अप्पा भंडारे, नगरसेविका अश्विनीताई राहुल भंडारे आणि तक्षशिला प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला यंदाही पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्रातील मानाच्या दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणून या दहीहंडी उत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरते.
दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रितू शिवपुरी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली.

यावेळी पुणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. दहीहंडीच्या निमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक, गोविंदा पथके आणि तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला.
दरवर्षी हजारो, तसेच मोठ्या संख्येने नागरिक या उत्सवासाठी एकत्र येत असून, तक्षशिला प्रतिष्ठानचा हा दहीहंडी उत्सव पुण्यातील एक लोकप्रिय आणि आकर्षक उत्सव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
विशेष आकर्षण
तक्षशिला प्रतिष्ठान भव्य दहीहंडी उत्सव : प्रमुख आकर्षण — अनुष्का बेनके (भुंडीश), मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री.



