मोठी बातमी! 2026-27 साठी विविध स्पर्धा परीक्षा; 30 वर्षे वय ओलांडले तरी करता येणार अर्ज !

चाणक्य NEWS | प्रतिनिधी
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, 30 वर्षे वय ओलांडलेले इच्छुक उमेदवारदेखील अर्ज करू शकणार आहेत.
TRTI, BARTI, SARTHI, ARTI, AMRUT आणि MAHAJYOTI यांच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित योजनेची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासून ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.
उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अचूकपणे सादर करणे आवश्यक आहे.
🔗 ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत लिंक
➡️ MAHAJYOTI:
https://registration.mahajyoti.org.in/
➡️ SARTHI:
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️ ARTI:
https://articet2026.cbtexam.in/
➡️ BARTI:
https://barticet2026.cbtexam.in/
➡️ TRTI:
https://trticet2026.cbtexam.in/
➡️ AMRUT:
https://amrutcet2026.cbtexam.in उमेदवारांसाठी महत्त्वाचे
अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात, पात्रता निकष, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.



