Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेमहाराष्ट्र

ऋचा सामाजिक संस्थेतर्फे लोहगावमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा !

शिक्षकांचा सन्मानपत्र, शाल व तुळशीचे रोप देऊन गौरव !

पुणे | चाणक्य NEWS प्रतिनिधी :
ऋचा सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोहगाव येथील पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक १ व २ मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेच्या सचिव अनिता पाटील यांनी ऋचा सामाजिक संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. महिला बचत गट, विधवा महिलांचे सक्षमीकरण, स्ट्रीट चिल्ड्रनसाठीचे उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कार्य तसेच संस्थेमार्फत दिले जाणारे मोफत सल्ला व मार्गदर्शन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा मांडला.

यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता आपल्या भाषणातून सुंदर शब्दांत व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मनोगतामुळे कार्यक्रमाला भावनिक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या पर्यवेक्षिका श्रीमती वाघमारे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. ऋचा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पाटोळे यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा सन्मानपत्र, शाल व तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला.

     

यावेळी शाळेचे शिक्षक नितीन माने सर, मुख्याध्यापिका श्रीमती कंद मॅडम, श्रीमती आशा मोरे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन संस्थेचे सल्लागार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक व लेखक सिताराम बबनराव गायकवाड (अमरजी सर) यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले. तसेच समाजसेविका श्रीमती मंगलताई गायकवाड आणि कृष्णा गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!