Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
महाराष्ट्रमुंबई (शहर जिल्हा)मुंबई उपनगर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; मुंबईत आंदोलनाची तयारी

मुंबई | चाणक्य NEWS प्रतिनिधी :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत दाखल होताना गाड्यांना झेंडे बांधून येऊ नका, मुंबईतील नातेवाईक आणि मित्रांकडे राहण्याची व्यवस्था करा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आंदोलनादरम्यान मैदान किंवा ‘वर्षा’ बंगल्याकडे जाऊ नका आणि पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका, असेही सांगण्यात आले आहे.
या आंदोलनाचे प्रमुख लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या संदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. “मुंबईत ताकद वाढवा,” असा संदेशही मराठा समाजाला देण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली किंवा आंदोलकांना ताब्यात घेतले तरी घाबरू नका, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शांततेचे आवाहन, आंदोलनाची रणनीती स्पष्ट
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आंदोलनाची रणनीती आखली जात असून, आंदोलकांनी शिस्त आणि शांतता राखावी, असा संदेश देण्यात आला आहे.
चाणक्य NEWS
लोकशाहीचा निर्भय आवाज !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!