तीन वर्षांच्या संघर्षातून कामगारांनी घडविला ‘झळं’ चित्रपटाचा इतिहास !

चाणक्य NEWS | छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील कामगारांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि कलाप्रेमाच्या जोरावर तब्बल तीन वर्षांच्या संघर्षातून मराठी चित्रपट निर्मितीचा अनोखा प्रयोग साकारला आहे. ‘झळं’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून कामगारांनी आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत इतिहास घडविला आहे.
कोरोना काळानंतर कामगारांना चित्रपट निर्मिती आणि अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे नियमित कामकाज सांभाळून रविवार ते रविवार मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी शूटिंग करण्यात आले. अशा प्रकारे जवळपास तीन वर्षे अथक मेहनत घेत ‘झळं’ या चित्रपटाची निर्मिती पूर्ण करण्यात आली.
https://youtu.be/Lm_Hriwi4r0?si=eKVFvGfu0DTqB4Tm
शेतकरी, सैनिक आणि कामगारांच्या जीवनावर आधारित कथा
‘झळं’ हा चित्रपट शेतकरी, सैनिक आणि कामगारांच्या जीवनातील संघर्ष, भावना आणि सामाजिक वास्तव यावर आधारित आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक संघर्षाचे चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे.
हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. मात्र मर्यादित आर्थिक बजेट आणि प्रचारासाठी उपलब्ध असलेल्या साधनांच्या अभावामुळे चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळू शकले नाही.
मोठे बजेट नाही, मोठे कलाकार नाहीत; पण विचार मोठे!
‘झळं’चे वैशिष्ट्य म्हणजे हा कोणताही बिग बजेट चित्रपट नाही. चित्रपटात मोठे किंवा प्रसिद्ध कलाकार नाहीत. निर्मिती करणाऱ्या अनेक कलाकारांना यापूर्वी चित्रपट क्षेत्राचा अनुभवही नव्हता.
https://youtu.be/jbbYS6y6xi0?si=jxGPq4RSIK9ozo2C 2023 नंतर आज युट्युबवर रिलीज
मात्र या सर्व मर्यादा बाजूला सारून कष्टकरी माणसांच्या जीवनाशी जोडलेले विचार आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे ‘झळं’ची कथा आणि त्यातून मांडलेले विचार मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत.

संघर्षातून उभे राहिले स्वप्न
चित्रपट निर्मितीच्या प्रवासात आर्थिक अडचणी, वेळेची कमतरता आणि अनुभवाचा अभाव अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तरीही कामगारांनी हार न मानता आपल्या सुट्टीच्या दिवसांचा उपयोग करून हे स्वप्न पूर्ण केले.
‘झळं’ हा केवळ एक चित्रपट नसून सामान्य कामगारांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि कलाप्रेमाचा दस्तऐवज आहे, असे म्हणता येईल.
या प्रयोगातून आर्थिक साधने मर्यादित असली तरी इच्छाशक्ती, मेहनत आणि सामाजिक विषय मांडण्याची प्रामाणिकता असेल तर वेगळ्या प्रकारचे आणि प्रभावी चित्रपट निर्माण करता येऊ शकतात, हा संदेश मिळतो.
जर भविष्यात बजेट उपलब्ध झालं तर, हा चित्रपट महाराष्ट्रभर गाजेल, कारण फक्त 25% कथेवरच हा चित्रपट बनला आहे, मूळ कथा अजून बाकी आहे.
कोणी प्रॉडुसर इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा असे त्यांनी स्पष्ट केलं आहे,
आर्थिक बजेट आणि अनुभवाच्या तुलनेत,
दोन दिवसात 35 हजार प्रेक्षक मिळवणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
या चित्रपटातून मांडलेले विचार मात्र बिग बजेटच्या चित्रपटांनाही विचार करायला लावतील.
‘Sarthak Movies’
या अधिकृत युट्यूब चॅनलवर चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून,
सर्वसामान्य शेतकरी, कामगारांचे अश्रू अनावर झाले आहे.
निर्माते : मनोहर सोनवणे, किरण दहितकर
लेखक / दिग्दर्शक : प्रभाकर दहितकर



