Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणे
Trending

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; भरपावसातही मोठी गर्दी

पुणे | चाणक्य न्यूज | प्रतिनिधी

कथित NEET परीक्षा पेपर लीक आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ पुण्यात आज विद्यार्थी आणि युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. लाल महाल आणि शनिवारवाडा परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा भरपावसातही मोठ्या उत्साहात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

देशभरात सुरू असलेल्या NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विद्यार्थी संघटना आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय तसेच परीक्षा व्यवस्थेतील विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी केली.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांविरोधात घोषणाबाजी केली. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!