दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचा संभाव्य कालावधी जाहीर

पुणे : चाणक्य NEWS | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांचा संभाव्य कालावधी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे आणि शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शैक्षणिक नियोजन करता यावे, या उद्देशाने या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
📌 इयत्ता १२ वी (HSC)
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७
लेखी परीक्षा: ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७
📌 इयत्ता १० वी (SSC)
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७
लेखी परीक्षा: १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७
या परीक्षा महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहेत.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, सध्या जाहीर केलेल्या तारखा संभाव्य कालावधी आहेत. विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन या कालावधीनुसार करावे आणि अंतिम विषयवार वेळापत्रकासाठी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.
— चाणक्य NEWS
लोकशाहीचा निर्भय आवाज !



