अखिल भारतीय ग्राहक पंचायतची वार्षिक सदस्यता मोहीम 1 ऑगस्टपासून सुरू !

चाणक्य न्यूज ,प्रतिनिधी – मुंबई
भारतीय ग्राहक पंचायतची वार्षिक सदस्यता मोहीम आजपासून म्हणजे 1 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण देशात सुरू होत आहे.
गेल्या 52 वर्षांपासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे देशभर पसरलेले ग्राहकांच्या हक्कांसाठी काम करणारे एकमेव संघटन आहे. प्रत्येक व्यवसायाची स्वतःची संघटना असताना ग्राहक मात्र असंघटित आहे. त्यामुळेच आज ग्राहकांची सर्वत्र लूट होत आहे.
ग्राहकांची लूट कशी होत आहे?
MRP ची मनमानी छपाई, हॉस्पिटलची अवास्तव बिले, औषधे आणि इम्प्लांटच्या जास्त किमती, चुकीचे विमा दावे, मॉल आणि एअरलाइन्सचे अतिरिक्त शुल्क, बिल्डरकडून पार्किंगची स्वतंत्र विक्री आणि जास्त सोसायटी चार्जेस अशा अनेक मार्गांनी ग्राहकाला लुटले जात आहे. याचे मूळ कारण म्हणजे ग्राहक एकजूट नाही.
जर सर्व ग्राहक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून एकत्र आले तरच सरकारवर दबाव टाकून ग्राहक-केंद्रित धोरणे बनवता येतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.

ऑनलाईन सदस्यता लिंक:
https://abgpindia.in/login?tab=register
http://2. https://pages.razorpay.com/ABGPmembership
अधिक माहितीसाठी वेबसाइट:
http://www.abgpinida.in | http://www.abgpindia.com
श्री. राजेंद्र किसन बंडगर
संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोंकण प्रांत
मो. 9975712153
अखिल भारतीय ग्राहक पंचायत काय काम करते? 1. केंद्र ते ग्रामपातळीपर्यंत नेटवर्क: केंद्रीय, क्षेत्र, प्रांत, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर कार्यकर्ते काम करतात. ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोफत मार्गदर्शन दिले जाते.
2. सरकारी स्तरावर मदत: ग्राहक आयोगात केस दाखल करणे, विविध सरकारी कार्यालयात पाठपुरावा करणे आणि निवेदने देणे.
3. प्रबोधन: शाळा-कॉलेजमध्ये ग्राहक संरक्षण कायदा, सायबर सुरक्षा, BIS केअर, महानगरपालिका कायदा, शेतकरी योजना आणि शैक्षणिक फीबाबत जनजागृती केली जाते.
4. ग्राहक मार्गदर्शन केंद्रे: अनेक ठिकाणी ग्राहक मार्गदर्शन केंद्रे चालवून गॅस, वीज, मोबाईल, बँक, विमा, घर खरेदी यांसारख्या तक्रारी सोडवण्यासाठी मदत केली जाते.

विशेष म्हणजे हे सर्व काम कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने करतात.
सदस्य बना आणि आंदोलन मजबूत करा:
ग्राहकांनी संघटित होऊन या चळवळीत सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
