Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणे

पुण्यातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय, बी.ई.जी., खडकी येथे आज सेवा फाउंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण !

खडकी, पुणे | चाणक्य NEWS

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत SEWA FOUNDATION NGO (Social Empowerment & Welfare Association) यांच्या वतीने आज केंद्रीय विद्यालय, BEG, खडकी, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

https://youtu.be/OeXlAfrY-jA?si=aU_2KBINFaM4Ezlh

         

या कार्यक्रमास केंद्रीय विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षकवृंद तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन केले.

               

वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि घटणारे हरित क्षेत्र यांचा विचार करून पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी केवळ वृक्षारोपणच नव्हे तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची शपथही घेतली.

         

यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी जीवनाची अमूल्य भेट आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.”     

         

SEWA FOUNDATION ही संस्था शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. केंद्रीय विद्यालय, BEG, खडकी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आजचा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शेवटी सर्व नागरिकांना “एक व्यक्ती – एक वृक्ष” हा संकल्प स्वीकारून पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!