Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेमहाराष्ट्र

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर मुख्य प्रवक्तेपदी श्री राजाभाऊ दुर्गे यांची नियुक्ती

शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी

चाणक्य NEWS , पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य प्रवक्तेपदी श्री. श्री राजाभाऊ दुर्गे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री  शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते दुर्गे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीपत्रात दुर्गे यांच्या आजपर्यंतच्या पक्षातील सेवाभावी कार्याची दखल घेत, राष्ट्रीय पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जनतेच्या प्रगती व कल्याणासाठी सहकाऱ्यांना सोबत घेऊन अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे समाजातील सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडणे आणि जनतेशी संवाद साधणे, ही मुख्य प्रवक्ते म्हणून दुर्गे यांच्यासमोरील महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.
या नियुक्तीबद्दल राज अनंत दुर्गे यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. दुर्गे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचा जनसंपर्क आणि संवाद अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!