Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेमहाराष्ट्र

युवकांच्या रोजगारासाठी मोठा पुढाकार; पिंपरी-चिंचवडमध्ये ५,०००+ रोजगाराच्या संधी!

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या संकल्पनेतून भव्य नोकरी मेळावा २०२६; ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग

चाणक्य NEWS | पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य नोकरी मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या संकल्पनेतून, शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सौ. सुलभाताई उबाळे आणि शिवसेना गटनेते तथा नगरसेवक श्री. विश्वजीत बारणे यांच्या प्रयत्नातून तसेच YuvaHub यांच्या सहकार्याने हा रोजगार मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात ५,००० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, ५० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. विविध शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना एकाच ठिकाणी विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी मिळणार असल्याने युवकांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📅 मेळाव्याची माहिती

🗓️ दिनांक : रविवार, ३० ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
📍 ठिकाण : चिंचवडे लॉन्स अँड बँक्वेट हॉल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड गाव

📝 नोंदणी सुरू!

नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी लिंक :
www.shrirangappabarne.in/nokarimelawa

📢 युवकांनी संधीचा लाभ घ्यावा

पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच आपल्या मित्रपरिवारातील, नातेवाईक आणि परिचयातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

“एक संधी करिअर बदलू शकते; रोजगार मेळाव्यात सहभागी व्हा आणि आपल्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका!”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!