Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेपुणे विभाग

पिढ्या बदलल्या, पण विश्वास कायम! चंदूकाका सराफच्या २०० वर्षांच्या वाटचालीचा चंदननगर शाखेत जल्लोष !

पुणे | चाणक्य NEWS | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि विश्वासार्ह सुवर्णपेढी म्हणून ओळख असलेल्या चंदूकाका सराफ या प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडने आपल्या गौरवशाली वाटचालीची २०० वर्षे पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. “पिढ्या बदलल्या, पण विश्वास मात्र तोच” या विश्वासाला सार्थ ठरवत चंदूकाका सराफने आपल्या ग्राहकांशी असलेले नाते आजवर कायम जपले आहे.

या २०० वर्षांच्या गौरवशाली परंपरेनिमित्त चंदूकाका सराफ, चंदननगर शाखेत नवीन ऑफर्सच्या स्टँडीचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनीताई राहुल भंडारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी मा. नगरसेवक राहुल आप्पा भंडारे, चंदूकाका सराफच्या Marketing and Advertisement Department चे कुमार राठोड सर, तसेच चंदननगर शाखेचे अजित सर आणि रूपाली मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

       

नवीन ऑफर्सच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका अश्विनीताई राहुल भंडारे यांनी चंदूकाका सराफच्या २०० वर्षांच्या यशस्वी आणि विश्वासार्ह वाटचालीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून चंदूकाका सराफने महाराष्ट्रातील सुवर्ण व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

मा. नगरसेवक राहुल आप्पा भंडारे यांच्या वतीनेही चंदूकाका सराफच्या २०० वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यातही या संस्थेने ग्राहकांचा विश्वास कायम राखत नवनवीन उपक्रम आणि आकर्षक ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा द्यावी, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

बारामतीपासून सुरू झालेली विश्वासाची ही सुवर्णपरंपरा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून, २०० वर्षांचा हा प्रवास चंदूकाका सराफच्या विश्वासार्हतेची आणि ग्राहकांशी असलेल्या अतूट नात्याची साक्ष देणारा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!