Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
देशमहाराष्ट्र

UPI च्या नव्या चार्ज नियमांची १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे : चाणक्य NEWS | प्रतिनिधी

डिजिटल पेमेंटचा वाढता वापर लक्षात घेता UPI व्यवहारांबाबत नवीन चार्ज नियम १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती  देण्यात आली आहे. या नव्या नियमांमध्ये ग्राहकांकडून कोणताही अतिरिक्त चार्ज न आकारता, काही व्यापारी व्यवहारांवर MDR (Merchant Discount Rate) लागू होण्याची माहिती देण्यात आली आहे.
माहितीनुसार, P2P (व्यक्तीकडून व्यक्तीकडे) होणाऱ्या UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच P2M (व्यक्तीकडून व्यापाऱ्याकडे) व्यवहारांमध्ये ₹2,000 पर्यंतच्या व्यवहारांवर MDR शून्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या P2M व्यवहारांसाठी 0.40 टक्के MDR लागू होणार असल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. तसेच ₹75,000 किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहारांवर कमाल ₹300 MDR आकारला जाईल, असेही नमूद आहे.
उदाहरणातून समजून घ्या


उदाहरणानुसार,
₹1,500 व्यवहार — MDR ₹0
₹2,000 व्यवहार — MDR ₹0
₹3,000 व्यवहार — 0.40% प्रमाणे MDR ₹12
₹50,000 व्यवहार — 0.40% प्रमाणे MDR ₹200
₹1,00,000 व्यवहार — कमाल MDR ₹300
या बदलाचा मुख्य परिणाम व्यापारी आणि मर्चंट व्यवहारांवर होणार असल्याचे माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांना UPI वापरताना थेट चार्ज आकारला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या शुल्काबाबत व्यापाऱ्यांनी आपल्या बँक किंवा पेमेंट सेवा प्रदात्याकडून लागू असलेल्या अधिकृत MDR दरांची खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!