Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणे

मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पाहणी

मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची पाहणी बचावकार्याला गती देण्याचे निर्देश - युद्धपातळीवर काम सुरू

चाणक्य न्यूज | पिंपरी-चिंचवड

मोशी, पिंपरी-चिंचवड | 17 एप्रिल 2026

मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दुर्घटना कळताच तातडीने दाखल झालेल्या वहिनींनी सुरू असलेल्या बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व NDRF बचाव पथकाला महत्त्वाच्या सूचना दिल्या.

युद्धपातळीवर बचावकार्याचे आदेश
“अडकलेल्या प्रत्येक कामगारापर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचा. वेळ वाया न घालवता युद्धपातळीवर आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा” – असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिले.

अतिरिक्त यंत्रणा, आधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले.

कुटुंबियांना धीर
त्यानंतर वहिनींनी दुर्घटनेमुळे चिंताग्रस्त झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला. जखमींना सर्वोत्तम उपचार आणि मृतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत तातडीने देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रमुख उपस्थिती
यावेळी  पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष अण्णा बनसोडे , आमदार मा. सुनील आण्णा शेळके, महापौर रवी लांडगे, माजी आमदार विलासशेठ लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष शेखर काटे तसेच आजी-माजी नगरसेवक, पालिका अधिकारी आणि संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!