Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणे

माजी सैनिकांची माऊली सेवेत देशसेवा

सासवड ते पंढरपूर - 4 वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनाची निःस्वार्थ सेवा

चाणक्य न्यूज |  प्रतिनिधी: जयपाल दगडे, पुणे

माजी सैनिकांची माऊली सेवेत देशसेवा
सासवड ते पंढरपूर – 4 वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनाची निःस्वार्थ सेवा

पुणे,  10 जुलै 2026 – आर्मी मधून रिटायर झाल्यानंतरही देशसेवा सुरूच ठेवणाऱ्या माजी सैनिकांनी आषाढी वारीत एक नवा आदर्श घालून दिला आहे. गेली 4 वर्षे ते माऊलीच्या सेवेत आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सासवड ते पंढरपूर या संपूर्ण वारी मार्गावर ही टीम 24×7 तैनात असते. वारीदरम्यान कोणतीही घटना घडल्यास तातडीने धाव घेऊन मदत करणे, गर्दी नियंत्रण, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे हे काम ते लष्करी शिस्तीने करतात.

या सेवाकार्याची सूत्रे माजी सैनिक सुधीरचंद्रा जगताप आणि श्री जयपाल दगडे यांच्याकडे आहेत. आर्मीमध्ये मिळालेली शिस्त, टीमवर्क आणि आपत्ती हाताळण्याचा अनुभव ते आज वारकऱ्यांच्या सेवेत वापरत आहेत.

माजी सैनिक सुधीरचंद्रा जगताप म्हणाले, “आर्मीमध्ये देशाची सेवा केली, आता माऊलीच्या सेवेत तीच ऊर्जा लावतोय. वारीत लाखो वारकरी असतात. एखाद्याला चक्कर आली, पायाला ठेच लागली, हरवलेलं मूल सापडलं, पाऊस-दरड सारखी आपत्ती आली तर आमची टीम सेकंदात तिथे पोहोचते. हेच आमचं पुण्य.”

श्री जयपाल दगडे यांनी सांगितले, “सासवडपासून पंढरपूरपर्यंत आम्ही टीम विभागून काम करतो. रेस्क्यू किट, फर्स्ट एड, वॉकी-टॉकी सगळं सोबत असतं. माऊलींच्या सेवेत जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही.”

लष्करी पार्श्वभूमीमुळे या टीमची शिस्त, वेग आणि समन्वय इतरांपेक्षा वेगळा आहे. गेली 4 वर्षे कोणत्याही मोठ्या दुर्घटनेला त्यांनी वेळीच प्रतिबंध केला आहे. वारकरी मंडळी आणि स्थानिक प्रशासनानेही त्यांच्या या कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.

खऱ्या अर्थाने “सेवा हीच ईश्वर पूजा” हे ब्रीद त्यांनी जगून दाखवले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!