Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
महाराष्ट्र

शाळा सोडल्यानंतरही शैक्षणिक नोंदीतील चुकीची जन्मतारीख दुरुस्त करण्याचा मार्ग खुला

अहिल्यानगर   चाणक्य NEWS |  प्रतिनिधी :

शाळा सोडल्यानंतर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदीतील जन्मतारीख किंवा इतर नोंदीमध्ये झालेली स्पष्ट चूक दुरुस्त करण्याचा अर्ज केवळ विद्यार्थी संबंधित शाळेत आता शिकत नाही, या कारणावरून नाकारता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण भूमिका मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली आहे.

Writ Petition No. 8739 of 2026 – Sayyad Suhana Mubin विरुद्ध State of Maharashtra & Others या प्रकरणात न्यायालयाने शैक्षणिक नोंदीतील दुरुस्तीच्या मागणीचा लागू नियम व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे विचार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात विद्यार्थिनीने शाळा सोडल्यानंतर जन्मतारखेतील दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, शाळा सोडल्याच्या कारणावरून संबंधित मागणी नाकारण्यात आली होती. न्यायालयाने अशा प्रकारे केवळ शाळा सोडल्याचा आधार घेऊन अर्ज फेटाळणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने Janabal Himmatrao Thakur विरुद्ध State of Maharashtra & Others या Full Bench निर्णयाचाही संदर्भ घेतला असून, लागू नियमांनुसार शालेय नोंदीतील स्पष्ट मानवी, कारकुनी अथवा तांत्रिक चुका दुरुस्त करण्याच्या मागणीचा कायद्यानुसार विचार करता येतो, ही बाब अधोरेखित केली आहे.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक तसेच संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदीतील दुरुस्तीच्या अर्जांकडे कायदेशीर तरतुदींनुसार पाहावे, अशी मागणी कायदा प्रेमी दीपक पाचपुते यांनी केली आहे.

विद्यार्थी किंवा पालकांनी चुकीची जन्मतारीख अथवा इतर शैक्षणिक नोंद आढळल्यास संबंधित कागदपत्रांसह सक्षम प्राधिकरणाकडे कायदेशीर पद्धतीने अर्ज करावा. केवळ “विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे” हे कारण देऊन अर्ज सरसकट नाकारू नये, याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही पाचपुते यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!