Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
महाराष्ट्र

महसूल विभागाचा लोकाभिमुख निर्णय; आता दुपारी ३ ते ५ अधिकाऱ्यांची नागरिकांना थेट भेट

मुंबई | चाणक्य NEWS प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी, प्रलंबित प्रकरणे आणि शासकीय कामकाजासंदर्भातील निवेदने थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणे अपेक्षित आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांची थेट भेट घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, तक्रारी, अर्ज तसेच विविध प्रशासकीय अडचणींबाबत नागरिकांना आपले म्हणणे अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहे.

कोणते अधिकारी नागरिकांना भेटणार?

या नागरिक भेटीच्या वेळेत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी), तहसीलदार आणि नायब तहसीलदार नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी उपलब्ध राहतील.

निर्णयाचा उद्देश

नागरिकांना प्रशासकीय समस्या मांडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहोचता यावे, तसेच छोट्या-छोट्या प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार वरिष्ठ कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

महसूल विभागाच्या या निर्देशामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील थेट संवाद वाढण्यास मदत होऊन तक्रारी व प्रलंबित बाबींच्या निराकरणाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🕒 नागरिक भेटीची वेळ : दररोज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!