Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणेपुणे विभागमहाराष्ट्र

व्हीनस इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा !

व्हीनस इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

चाणक्य NEWS | प्रतिनिधी , मोशी, पुणे

मोशी ,पुणे : व्हीनस इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात तिरंगी पताका, फुगे आणि आकर्षक सजावटीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं सादर केली तसेच प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी भगव्या रंगाच्या पोशाखात सादर केलेल्या समूह नृत्य व साहसी प्रात्यक्षिकांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

       

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा सहभाग, शिस्त आणि देशभक्तीची भावना विशेष लक्षवेधी ठरली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला. यावेळी शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी व तिरंगी सजावट करण्यात आली होती.

स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, एकता, शिस्त आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

देशभक्तीच्या रंगात रंगलेला हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!